Uttarakhand Tunnel Rescue : ४१ कामगारांची प्रकृती उत्तम, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती | पुढारी

Uttarakhand Tunnel Rescue : ४१ कामगारांची प्रकृती उत्तम, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सिल्क्यारा बोगद्यातून सुखरूप बाहेर आलेल्या सर्व कामगारांवर उपचार सुरू आहेत, आज बुधवारी (दि.२९) आणि गुरूवारी (दि.३०) वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. ऋषिकेश एम्सचे संचालक, आरोग्य विभागातील अधिकारी आणि डॉक्टरांच्या निर्देशानुसार कामगारांना घरी पाठवण्यात येईल. अशी माहिती उत्तराखंडचे आरोग्य मंत्री धनसिंग रावत यांनी आज (दि.२९) दिली. (Uttarakhand Tunnel Rescue)

राज्य आणि केंद्र सरकारसाठी हे एक मोठे आव्हान होते. पंतप्रधान कार्यालय, सर्व यंत्रणा, भारत सरकार, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि जिल्हा प्रशासनासह सर्वांच्या एकत्रित कार्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचेही उत्तराखंडचे आरोग्य मंत्री धनसिंग रावत म्हणाले.
एम्स ऋषिकेशचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व कामगारांची ईसीजी करण्यात आली आहे, सर्वांची प्रकृती चांगली असून त्यांचा रक्तदाब आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळीही बरोबर आहे. (Uttarakhand Tunnel Rescue)

दरम्यान, सिल्क्यारा बोगद्यातून ४१ कामगारांची सुटका केल्यानंतर त्यांना चिन्यालीसौरच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. २४ तास विश्रांती घेतल्यानंतर एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी (दि.२९) दुपारी भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने कामगारांना एम्स ऋषिकेशमध्ये आणण्यात आले. (Uttarakhand Tunnel Rescue)

हेही वाचा :

 

 

 

Back to top button