Foxconn : फॉक्सकॉन भारतामध्ये गुंतवणार दीड अब्ज डॉलर | पुढारी

Foxconn : फॉक्सकॉन भारतामध्ये गुंतवणार दीड अब्ज डॉलर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयफोनची निर्मिती करणारी तैवानची फॉक्सकॉन कंपनी भारतात 1.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. चीन आणि अमेरिकेतील राजकीय तणाव वाढल्याने चीनवरील अवलंबित्व कमी केले जात आहे. त्यामुळे भारताला संधीची कवाडे खुली झाली आहेत. (Foxconn)

तैवानमधील शेअर बाजाराला फॉक्सकॉनने सोमवारी उशिरा माहिती सादर केली. त्यात भारतातील गुंतवणुकीचा उल्लेख आहे. मात्र, नेमकी कोणत्या राज्यात गुंतवणूक करणार, याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही. ही गुंतवणूक बांधकाम आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठी वापरली जाईल, असे सांगितले जात आहे. (Foxconn)

आयफोननिर्मितीसाठी चीनला प्राधान्य दिले जात होते. कोरोनापासून दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. तेव्हापासून सुरू असलेले निर्गुंतवणुकीचे धोरण अद्यापही कायम आहे. फॉक्सकॉन ही आयफोनची निर्मिती करणारी मोठी कंपनी आहे. त्यांना निम्मा महसूल अ‍ॅपल कंपनीकडून मिळतो. फॉक्सकॉनने काही वर्षांपूर्वीच अ‍ॅपल फोननिर्मितीसाठी भारताला पसंती दिली आहे. नुकताच आलेला आयफोन-15 भारतातच तयार झाला आहे.फॉक्सकॉनला उत्पादन क्षमता दुप्पट करायची आहे. त्यासाठी भारताची निवड करण्यात आली आहे. कर्नाटकने ऑगस्ट महिन्यात फॉक्सकॉन 60 कोटी डॉलर गुंतवणार असल्याचे जाहीर केले होते. आयफोन आणि सेमीकंडक्टर उपकरणांची निर्मिती येथे केली जाणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button