‘तृणमूल’ खासदार महुआ मोइत्रा यांची सीबीआय चौकशी सुरु | पुढारी

'तृणमूल' खासदार महुआ मोइत्रा यांची सीबीआय चौकशी सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संसदेत प्रश्न विचारण्‍यासाठी उद्‍योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाचघेतल्‍याच्‍या आरोपप्रकरणी सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्‍या खासदार महुआ मोइत्रा यांची चौकशी सुरु केली आहे. ( Mahua Moitra Cash For Query Case )

सीबीआयच्‍या सूत्रांनी आज (दि.२५ ) ‘इंडिया टूडे’ला सांगितले की, तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू केली आहे. लोकपालच्या आदेशानुसार आम्ही चौकशी सुरू केली आहे. मात्र अद्याप महुआ मोईत्रा यांच्‍यावर गुन्‍हा दाखल केलेला नाही.

संसदेत प्रश्न विचारण्‍यासाठी तृणमूल काँग्रेसच्‍या खासदार महुआ मोइत्रा यांनी उद्‍योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतली होती, अशी तक्रार भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली होती. दुबे यांनी म्‍हटले होते की, लोकपालने ८ नोव्हेंबर रोजी मोईत्रा यांच्‍याविरुद्ध सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.” ( Mahua Moitra Cash For Query Case )

मोईत्रा यांनी भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप दुबे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. दुबे यांनी सांगितले की हे आरोप त्यांना मिळालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाच्या पत्रावर आधारित आहेत. या प्रकरणी लोकसभा आचार समितीने मोईत्रा यांना खालच्या सभागृहातून अपात्र ठरवण्याची शिफारस करणारा अहवाल स्वीकारला होता. हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button