BJP On Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात भाजप पुन्हा आक्रमक, ECI कडे तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी | पुढारी

BJP On Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात भाजप पुन्हा आक्रमक, ECI कडे तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजपने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्‍याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भाजपने निवडणूक आयोगाकडे राहुल गांधी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे खाते त्वरित हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमधून आक्षेपार्ह मजकूरही त्वरित काढून टाकण्यात यावा, असे देखील भाजपने निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.  (BJP On Rahul Gandhi)

राजस्थान विधानसभेसाठी आज (दि.२५) २०० पैकी १९९ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी ‘जनतेच्या हिताचे आणि हमी देणारे काँग्रेस सरकार पुन्हा निवडून द्या. #काँग्रेस_पुन्हा’ अशी पोस्ट ट्विट केली आहे. यावर भाजपने राहुल गांधींविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी राजस्थानच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे. (BJP On Rahul Gandhi)

यापूर्वी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती म्हटल्यावरून अडचणीत सापडले होते. या बद्दल राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस देखील पाठवली होती. तेव्हा देखील भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल  केला होता. (BJP On Rahul Gandhi)

हेही वाचा:

Back to top button