PM मोदींची ‘तेजस’ भरारी; म्‍हणाले, “हा अनुभव…”

PM Modi
PM Modi

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २५) लढाऊ विमान 'तेजस'मधून भरारी घेतली. याबाबत त्यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "'तेजस'मधून यशस्वीरित्या प्रदक्षिणा पूर्ण केली. हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता." (PM Modi)

PM Modi : राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लढाऊ विमान 'तेजस'मधून उड्डाण केले. या लढाऊ विमानातून केलेल्‍या प्रवासाचे याचे काही फोटो शेअर त्‍यांनी साेशल मीडिया प्‍लॅटफाॅर्म  'X' खात्यावर शेअर केले आहेत. आपल्‍या पाेस्‍टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "तेजस'मधून यशस्वीरित्या प्रदक्षिणा पूर्ण केली. हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता. आपल्या देशाच्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि मला आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना देऊन गेली."

पंतप्रधान मोदींच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2019 मध्ये बेंगळुरूच्या HAL विमानतळावरून तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले होते. स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मध्ये उड्डाण करणारे ते पहिले संरक्षण मंत्री ठरले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news