लग्नाच्या पंगतीतील रसगुल्ला बनला वऱ्हाडयांच्या हाणामारीचे कारण; वाचा सविस्तर | पुढारी

लग्नाच्या पंगतीतील रसगुल्ला बनला वऱ्हाडयांच्या हाणामारीचे कारण; वाचा सविस्तर

पुढारी ऑनलाईन : लग्न समारंभ म्हटलं कि अनेक मजेदार किस्से घडत असतात. लग्नाचा मेनू काय हा प्रत्येक पाहुण्यांमध्ये कुजबुजत का होईना विचारला जाणारा प्रश्न आहे. नवरा – नवरीनंतर कोणत्याही लग्नसमारंभात होणारी चर्चा मात्र मेनूबाबतच असते. उत्तर प्रदेशातील आग्रा इथे मात्र लग्नातला मेनू वऱ्हाडयांना भलताच महागात पडला आहे. लग्नाच्या जेवणातील रसगुल्ले संपले म्हणून झालेल्या मारामारीत 6 वऱ्हाडी जखमी झाले आहेत. रविवारी रात्री हा प्रकार घडला. जखमी झालेल्या या सहाही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजलं आहे.

या हाणामारीसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. ब्रिजभान कुशवाहा यांच्या घरी असलेल्या लग्न समारंभात कुणीतरी रसगुल्ले संपल्याबाबत कमेंट केली. नेमकी हीच कमेंट या हाणामारीच कारण बनल्याच समोर येत आहे. या वादात भगवान देवी, योगेश, मनोज, कैलाश आणि धर्मेंद्र अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा :

Back to top button