शिंदे गटाचे १३ खासदार निवडणूक लढणारच : खासदार कृपाल तुमाने | पुढारी

शिंदे गटाचे १३ खासदार निवडणूक लढणारच : खासदार कृपाल तुमाने

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाचे १३ खासदार पुन्हा निवडणुका लढविणार असून आम्हाला तयारी सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे रामटेकचे खा कृपाल तुमाने यांनी स्पष्ट केले आहे. एका वाहिनीशी बोलताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

तुमाने म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना तयारीच्या सूचना दिलेल्या आहेत. विधिमंडळ अधिवेशनानंतर महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा होणार आहे. त्या बैठकीतच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविला जाणार आहे. मात्र, सध्यातरी आम्हाला तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने रामटेक लोकसभा मतदारसंघात काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय शिबीरे रामटेक परिसरात घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभेत महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील व ते पंतप्रधान मोदी यांना भक्कमपणे साथ देतील, असे खासदार तुमाने यांनी सांगितले. याचवेळी संजय राऊत यांच्या वक्तव्याची कुणीच दखल घेत नाही, वेडा राजकारणी संबोधतात असेही खा तुमाने म्हणाले.

Back to top button