Earthquake in Ladakh and Sri Lanka | लडाख आणि श्रीलंकेला भूकंपाचे जोरदार धक्के

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन : लडाख आणि श्रीलंकेत मंगळवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. श्रीलंकेतील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती. त्यानंतर लगेच ३० मिनिटांच्या आत लडाखमध्ये ४.४ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला.

संबंधित बातम्या 

मंगळवारी दुपारी श्रीलंकेत ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने म्हटले आहे. श्रीलंकेत दुपारी १२.३१ वाजता पहिल्यांदा ६.२ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप १० किमी खोलीवर होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोलंबोच्या आग्नेयेस १,३२६ किमी अंतरावर होता.

त्यानंतर दुसरा भूकंप कारगिल, लडाखमध्ये १.०८ वाजता झाला. हा भूकंप २० किमी खोलीवर झाला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिल, लडाखपासून ३१४ किमी उत्तर-वायव्य दिशेला होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

भूकंप कशामुळे होतो?

पृथ्वीच्या आत ७ प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार आदळल्याने प्लेट्सचे कोपरे वाकतात. जेव्हा अधिक दाब निर्माण होतो. तेव्हा प्लेट्स तुटू लागतात आणि खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि अडथळ्यानंतर भूकंप होतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news