Hyderabad building fire | हैदराबादमध्ये इमारतीला आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू | पुढारी

Hyderabad building fire | हैदराबादमध्ये इमारतीला आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन : हैदराबादच्या नामपल्ली येथील बाजारघाट येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग बहुमजली अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यात लागली होती. जिथे केमिकलचे काही ड्रम ठेवले होते आणि नंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. या इमारतीतून आतापर्यंत सुमारे २०लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, असे अग्निशमन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मृतांमध्ये महिलांचा अधिक समावेश आहे. त्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होत्या. तर तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर राहणारे लोक किरकोळ जखमी झाले आहेत. रमेश जैस्वाल असे इमारतीच्या मालकाचे नाव असून तो सध्या फरार आहे. तो इमारतीच्या तळमजल्याचा तेलाचे ड्रम ठेवण्यासाठी गोदाम म्हणून वापरत करत होता.

इमारतीच्या तळमजल्यावर केमिकल ठेवण्यात आले होते. या ठिकाणी ठिणगी पडल्याने ही आग लागल्याचे समजते. सकाळी ९.३५ च्या सुमारास अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले.

हैदराबादमधील आणखी एका आगीच्या घटनेत रविवारी जुन्या शहरातील मीर चौक पोलिस स्थानक हद्दीतील एका इमारतीमध्ये चप्पल असलेल्या पाच गोदामांना भीषण आग लागली होती.

मुलाला आणि महिलेला खिडकीतून बाहेर काढले (व्हिडिओ)

दरम्यान, आगीदरम्यान इमारतीत अडकलेल्या एका लहान मुलाची आणि महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. त्यांना खिडकीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ ANI ने शेअर केला आहे.

हे ही वाचा :

Back to top button