Manish Sisodia news | मनीष सिसोदिया आजरी पत्नीला भेटण्यासाठी घरी पोहचले; कोर्टाने दिली केवळ ६ तासांची परवानगी

( मनीष सिसोदिया संग्रहित छायाचित्र )
( मनीष सिसोदिया संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आजरी पत्नीला भेटण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ते आज (दि.११) त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी पत्नीच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. हे तेच ठिकाण आहे जिथे सध्या दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी राहतात. यापूर्वी हे सिसोदिया यांचे अधिकृत निवासस्थान होते. ते त्यांच्या आजारी पत्नीला आज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत म्हणजेच ६ तास भेटणार आहेत. या संदर्भातील व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. (Manish Sisodia news)

दिल्ली ऊस एव्हेन्यू कोर्टाने यापूर्वी सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी २२ नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात सीबीआय आणि ईडी या दोघांनीही सिसोदिया यांच्या अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला आहे. दरम्यान दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आणि पत्नीचा आजारपणाच्या कारणास्तव त्यांना आज कोर्टाने काही तासांचा दिलासा दिला आहे.

यानुसार, मनीष सिसोदिया पोलिस कर्मचार्‍यांच्या गराड्यात सकाळी १० वाजता जेलच्या गाडीतुनच मथुरा रोडवरील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यापुर्वीही जूनमध्येही त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आजारी असलेल्या त्यांच्या पत्नी सीमा यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्रत्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आज त्यांच्या पत्नीला भेटत आहेत. 

Manish Sisodia news : केवळ ६ तासांसाठी परवानगी

दिल्ली मद्य घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत. सिसोदिया यांनी आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी राऊस एव्हेन्यू कोर्टाकडे ५ दिवसांची परवानगी मागितली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. दरम्यान त्यांना कोर्टाने त्यांना केवळ ६ तास भेटण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार सिसोदिया सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पत्नीला भेटणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. (Manish Sisodia news)

भेटीदरम्यान कोर्टाने ठेवल्या 'या' अटी

या कालावधीत मनीष सिसोदीया यांना प्रसारमाध्यमांशी बोलू नये, कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी होऊ नये, असे आदेशही दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून देण्यात आले आहेत. (Manish Sisodia news)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news