Air Purifire : प्रदूषित हवेवर पर्याय म्हणून एअर प्युरिफायर घेताय ? त्यापूर्वी हे वाचा | पुढारी

Air Purifire : प्रदूषित हवेवर पर्याय म्हणून एअर प्युरिफायर घेताय ? त्यापूर्वी हे वाचा

पुढारी ऑनलाईन : सध्या संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे वायू प्रदूषण. जगातील प्रत्येक मोठं शहर वायू प्रदूषणाच्या समस्येने ग्रस्त आहे. झाडे लावणे, ऑड – ईवन फॉर्म्युलाचा अवलंब करणे अशा अनेक उपायांनीही वायू प्रदूषण कमी होताना दिसत नाही. यावर अनेकजण एअर प्युरिफायरचा पर्याय निवडत आहेत. एअर प्युरिफायर नक्की कसं काम करतं, त्याचा घरात कितपत उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी पुढील बाबी जरूर वाचा. ज्याप्रमाणे वॉटर प्युरिफायर काम करते त्याच प्रमाणे एअर प्युरिफायरही काम करते.

घरासाठी उपयुक्त असलेलं एअर प्युरिफायर अनेक फिल्टर सहित येतं. ज्या रूममध्ये हे मशीन ठेवलं आहे. त्या खोलीतील प्रदूषणाच्या पातळीनुसार एअर प्युरिफायर काम करतं. हवेतील प्रदूषण त्याच्या फिल्टरवर जमा होतं. साधारणत एका खोलीतील हवा शुद्ध करण्यासाठी प्युरिफायरला 15 मिनिटांपर्यंत वेळ लागू शकतो.

यामध्ये चार प्रकारचे फिल्टर असतात-

आयनिक जनरेटर
कार्बन फिल्टर
हेपा फिल्टर
अल्ट्रा व्हायोलेट रेडीएशन

एअर प्युरिफायर घरच्या किंवा ऑफिसच्या हवेतील बॅक्टेरिया, प्राण्यांचे केस, धूर, विषाणू बाहेर ठेवतात. पण अर्थातच जास्त वेळ बाहेर असणाऱ्या व्यक्तींसाठी हा पर्याय फारसा उपयुक्त नाही. कॅमफिल प्युरिफायरची किंमत जास्त आहे. हवा शुद्ध करण्यासोबतच प्युरिफायर दुर्गंधही नष्ट करते.प्रदूषणामुळे प्युरिफायरचे फिल्टर सतत बदलावे लागते. नाहीतर मशीनच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. याशिवाय प्युरिफायर हवा स्वच्छ करताना ओझोन वायू उत्सर्जित करतो. याचा फुफ्फुसावर वाईट परिणाम होऊ शकतो. याशिवाय स्वच्छ हवा उत्सर्जित करूनही अस्थमा अटॅक सारख्या आजारांपासून वाचवता येणं शक्य आहेच असं नाही.

हेही वाचा :

Back to top button