मानवी तस्करीप्रकरणी ‘एनआयए’ची १० राज्‍यांमध्‍ये धडक कारवाई, ५० हून अधिक ठिकाणी छापे | पुढारी

मानवी तस्करीप्रकरणी 'एनआयए'ची १० राज्‍यांमध्‍ये धडक कारवाई, ५० हून अधिक ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (दि.८) मानवी तस्करी प्रकरणी ( Human Trafficking cases ) १० राज्यांमध्ये धडक करावाई केली. त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, पुद्दुचेरी, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर राज्‍यांमध्‍ये तपास संस्‍थेने छापे टाकले. ही कारवाई स्‍थानिक पोलिसांच्‍या मदतीने करण्‍यात आल्‍याचे एनआयएच्या सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

‘एनआयए’च्या अनेक पथकांनी पहाटे एकाचवेळी 10 राज्यांमध्ये मानवी तस्‍करीमध्‍ये सहभागी असलेल्या संशयितांविरुद्ध छापे टाकण्यास सुरुवात केली. १० राज्‍यांमध्‍ये ५० हून अधिक ठिकाणी ही कारवाई करण्‍यात आली. गेल्या महिन्यात बंगळूर येथून ‘एनआयए’च्या पथकाने श्रीलंकेतील मानवी तस्करी प्रकरणात तामिळनाडूतील फरार आरोपी इम्रान खान याला अटक केली होती होती. त्‍याने अन्‍य आरोपींच्‍या मदs[d; श्रीलंकन नागरिकांची बेंगळुरू आणि मंगळुरू येथे विविध ठिकाणी तस्करी केल्‍याचे तपासात उघड झाले होते. एनआयएने या प्रकरणातील पाच भारतीय आरोपींविरुद्ध प्राथमिक आरोपपत्र दाखल केले होते.

एनआयए इतर मानवी तस्करी प्रकरणांचा तपास करत आहे ज्यात निष्पाप लोकांना तस्करांकडून खोटी आश्वासने देऊन आमिष दाखवले जाते, ज्यामध्ये कॅनडामध्ये रोजगारासाठी स्थलांतर करण्याबरोबच अन्‍य आमिषांचाही समावेश असल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले होते. याचा कारवाईचा पुढील भाग म्‍हणून आज १० राज्‍यांमध्‍ये धडक कारवाई करण्‍यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button