Anemia in children: राज्यात ६३ हजार मुले ॲनिमियाग्रस्त; २ कोटी २५ लाखांहून अधिक मुलांची तपासणी | पुढारी

Anemia in children: राज्यात ६३ हजार मुले ॲनिमियाग्रस्त; २ कोटी २५ लाखांहून अधिक मुलांची तपासणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: जागृत पालक, सुदृढ मुले मोहिमेअंतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑगस्टपर्यंत ६३ हजार बालके ॲनिमियाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाकडून राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मुलांची तपासणी करण्यात आली आहे. (Anemia in children )

फेब्रुवारीपासून जागृत पालक आणि सुदृढ बालके अभियानांतर्गत २ कोटी २५ लाखांहून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी तब्बल १ कोटी, ७६ हजार ४८८ मुलांमध्ये विविध कमतरता जाणवल्या. यामध्ये मध्यम आणि गंभीर स्वरूपाचा अशक्तपणा असलेली ६३ हजार २४७ मुले आढळून आली. (Anemia in children)

ॲनिमियामध्ये रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी होते. यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. शरीरातील इतर सर्व पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो. पर्यायाने अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. मुलांची बौध्दिक क्षमता व शारिरीक विकास कमी होतो. (Anemia in children)

हेही वाचा:

Back to top button