कारल्याचा कडूपणा घालविण्यासाठी काय करावे? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स | पुढारी

कारल्याचा कडूपणा घालविण्यासाठी काय करावे? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

- वर्षा शुक्ल

तुम्ही स्वयंपाक तयार केल्यानंतर आपल्या किचनची पट्टी स्वच्छ करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक मऊ कापड आणि लिंबाच्या रसासारखे घरगुती डिटर्जंटची आवश्यकता असते, ज्याने पट्टीचा वास जाईल आणि डागही दूर होतील.

लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही.

मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक, दोन केळी खावीत.

काजू व इतर ड्रायफूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाका.

कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात.

तोंडात फोड आल्यास एक हाताचे बोट दुधावरील सायीत बुडवा आणि त्या जागी लावा. आराम मिळेल.

लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो.

वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा.

गॅस स्टोव्हला स्वच्छ करायला हवा. जर स्वयंपाक करताना गॅसवर काही पडले असेल तर त्याला लगेचच स्वच्छ करा. म्हणजे जास्त कचरा किंवा घाण गॅसशेगडीवर किंवा स्टोव्हवर साठणार नाही.

मायक्रोवेव्हला स्वच्छ करताना थोडी काळजीपूर्वक करायला हवी. मायक्रोेवेव्हचा वापर झाल्यावर लगेच स्वच्छ करावा. याने त्यात अन्नाचा वास राहणार नाही आणि तेलाचे डागही दूर होतील. मायक्रोवेव्हला स्वच्छ करण्यासाठी एका मऊ कापडावर बेकिंग सोडा आणि मीठ घालून स्वच्छ करा.

Back to top button