Stock Market Updates | शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदी, कोणते शेअर्स तेजीत? | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

पुढारी ऑनलाईन : यूएस फेडरल रिझर्व्ह पुन्हा ‍व्याजदरवाढ करणार नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ४३० अंकांनी वाढून ६४,५०० वर पोहोचला. तर निफ्टी १३३ अंकांनी वधारून १९,२६६ वर गेला. (Stock Market Updates)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर (Sensex Today) टाटा मोटर्स, टायटन, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. इन्फोसिस, एसबीआय, एम अँड एम, एचडीएफसी बँक, एलटी हे शेअर्सही हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. तर एनटीपीसीचा शेअर घसरला.

बुधवारी यूएस फेडने ५.२५ टक्के- ५.५० टक्क्यांच्या श्रेणीत व्याजदर स्थिर ठेवल्यानंतर जागतिक बाजारात तेजी आली आणि यूएस बॉन्डचे उत्पन्न घसरले. अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांक काल सुमारे १.५ टक्क्यांनी वाढून बंद झाले. तर यूएस १० वर्षाय ट्रेझरी उत्पन्न तीन आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आले. आशियाई बाजारही तेजीत व्यवहार करत आहेत. (Stock Market Updates)

 

Back to top button