तेलंगणात महिलांना महिन्याला 4 हजारांचा लाभ : राहुल गांधी | पुढारी

तेलंगणात महिलांना महिन्याला 4 हजारांचा लाभ : राहुल गांधी

तेलंगण; वृत्तसंस्था : तेलगंणात काँग्रेस सत्तेत आल्यावर महिलांना प्रति महिना 4000 रुपयांचा लाभ देण्यात येणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले.

महिलांच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सामाजिक पेन्शन योजनेतून महिलांना प्रति महिना 2500 रुपये दिले जातील. याशिवाय गॅस दर पाचशे रुपयांनी कमी केले जातील. सार्वजनिक वाहतुकीसाठी 1 हजारापर्यंत महिलांना मदत केली जाईल. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यावर महिलांना प्रति महिना 4000 रुपयापर्यंत लाभ होईल, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या राजवटीत जनतेच्या पैशावर डल्ला मारण्यात आला आहे. हा पैसा जनतेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. भाजप आणि एमआयएमचा भारत राष्ट्र समितीला छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे काँग्रेस आणि बीआरएसमध्येच लढत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Back to top button