८१.५ कोटी भारतीयांच्‍या COVID-19 चाचणी डेटा लीक?

COVID-19 Data leak
COVID-19 Data leak
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील तब्बल ८१.५ कोटी भारतीय नागरिकांचा वैयक्तिक तपशील चोरीस गेला आहे. यामध्ये COVID-19 चाचणी डेटा, आधारकार्ड आणि पासपोर्ट आदी माहितीचा समावेश आहे. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा लीक प्रकरणामध्ये या प्रकरणाचा समावेश आहे. ( COVID-19 Data leak ) हा डेटा  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या कोविड-19 चाचणी नोंदींमधून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेचे गंभीर स्वरूप पाहता, आयसीएमआरने  तक्रार दाखल केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) या प्रकरणाची चौकशी करेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CERT-In ने ICMR ला उल्लंघन आणि नमुना डेटाच्या पडताळणीबद्दल माहिती दिली आहे. ती  ICMR च्या वास्तविक डेटाशी जुळते. डेटा लिक झाल्यानंतर  सरकारने विविध एजन्सी आणि मंत्रालयांच्या उच्च अधिकार्‍यांवर ताशेरे ओढले आहेत.लीकमध्ये परदेशी कलाकारांचा सहभाग आहे.  आयसीएमआरने तक्रार दाखल केल्यानंतर गांभीर्य पाहता  सीबीआय या प्रकरणाची चौकशी करेल.

COVID-19 Data leak : भारताच्या आरोग्य यंत्रणेला यापूर्वीही हॅक

भारताच्या आरोग्य यंत्रणेला हॅकर्सने लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बऱ्याचवेळा हॅक करण्यात आले आहे. गेल्या वर्षी, एम्सला सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला होता. त्यावेळी विविध आरोग्य  प्रणालींमध्ये बदल घडवून आणले होते. या सायबर हल्ल्यामध्ये भारताच्या शेजारील देशांपैकी एका देशाशी संबंध होता. गेल्या वर्षी, ICMR सर्व्हर हॅक करण्यासाठी ६,000 हून अधिक प्रयत्न केले गेले आहेत. एजन्सींनी ICMR ला डेटा लीक टाळण्यासाठी उपायात्मक कारवाई करण्यास सांगितले होते.

जून २०२३  मध्ये, एका टेलिग्राम बॉटने लसीकरणासाठी CoWIN पोर्टलवर नोंदणीकृत भारतीयांचा वैयक्तिक डेटा कथितपणे पोस्ट केला होता. आरोग्य मंत्रालयाने हा अहवाल नाकारला होता. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की नोडल सायबर सुरक्षा एजन्सीला आढळले की CoWIN प्लॅटफॉर्मचा थेटपणे उल्लंघन झालेले नाही.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news