वेदनादायी…उ. प्रदेशमध्‍ये स्कूल बस-स्कूल व्हॅनची समोरासमोर धडक, चार मुलांसह पाच ठार

अपघातानंतर स्‍कूल व्‍हॅनची झालेली अवस्‍था.
अपघातानंतर स्‍कूल व्‍हॅनची झालेली अवस्‍था.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील बदाऊन जिल्ह्यात आज सकाळी स्कूल बस आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या भीषण दुर्घटनेत बस चालकासह चार मुलांचा मृत्यू झाला आहे. १५ हून अधिक मुले जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक मुलांची प्रकृती चिंताजनक असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जवाहर नागला म्याऊ उसावन मार्गावर असलेल्या सत्यदेव विद्यापीठ इंटर कॉलेजची बस आणि एसआर पब्लिक स्कूल गौत्राची व्हॅन मुलांना घेऊन जात होती. नवीगंजजवळ दोन्‍ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. डीएम मनोज कुमार यांनी सांगितले की, म्याऊ पोलीस स्टेशन परिसरात हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बस चालकासह चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.16 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत मुलांपैकी एक विद्यार्थी बस चालकाचा मुलगा होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news