Ghaziabad Encounter | फोन स्नॅचिंगवेळी BTech विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपीचा पोलिसांनी केला एन्काऊंटर

Ghaziabad Encounter | फोन स्नॅचिंगवेळी BTech विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपीचा पोलिसांनी केला एन्काऊंटर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशात आणखी एका गुन्हेगाराचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. फोन स्नॅचिंगच्या घटनेत एका १९ वर्षीय बी-टेक विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी एका २८ वर्षीय गुन्हेगाराला सोमवारी पहाटे गाझियाबाद पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. ज्याचा एन्काऊंटर केला तो वाँटेड होता. (BTech student Kirti Singh death during phone snatching incident) जितेंद्र उर्फ ​​जीतू असे आरोपीचे नाव आहे, तो गाझियाबादच्या मसुरी येथील मिशाल गढी भागात राहणारा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Ghaziabad Encounter)

संबंधित बातम्या

गेल्या शुक्रवारी मसुरी भागात एनएच-९ वर फोन हिसडा मारुन चोरून नेण्याची घटना घडली होती. या घटनेत मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी एबीईएस कॉलेजची बी-टेकची विद्यार्थिनी कीर्ती सिंह हिला चालत्या ऑटोतून बाहेर ओढले होते. यात ती रस्त्यावर कोसळली आणि गंभीर जखमी झाली होती. कीर्ती ही हापूर येथे तिची मैत्रीण दीक्षा जिंदाल हिच्यासोबत ऑटो रिक्षाने घरी जात होती. याच दरम्यान तिचा मोबाईल चोरट्याने हिसडा मारून चोरून नेला होता. यादरम्यान ती गंभीर जखमी झाली होती. रविवारी गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात उपचारादरम्यान कीर्ती हिचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी रविवारी पोलिसांनी संशयित आरोपी बलबीरला गोळीबारानंतर अटक केली होती. तो बाईक चालवत होता तर जितेंद्र हा फोन स्नॅचिंगच्या घटनेवेळी मागे बसला होता.

गाझियाबादच्या ग्रामीण भागाचे डीसीपी विवेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास, पोलीस गंगा नदी रस्त्यावर तपासणी करत असताना, त्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना पाहिले आणि त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मागे फिरत पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान आरोपींनी अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. यात एक उपनिरीक्षक जखमी झाला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर ते रस्त्यावर पडले. पोलिसांनी घेराव घालून त्यांना पकडले. दौघांपैकी एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

पोलिसांच्या गोळीबारातील जखमी व्यक्तीचे नाव जितेंद्र असे आहे. तो फोन स्नॅचिंगच्या घटनेदरम्यान झालेल्या कीर्तीच्या मृत्यूला ( BTech student Kirti Singh death) जबाबदार आहे. तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले.

जितेंद्र याच्यावर दिल्ली-एनसीआरमधील विविध पोलिस ठाण्यांत दरोडा आणि स्नॅचिंगसह एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्याच्याविरुद्ध गँगस्टर कायदा लागू करण्यात आला होता. (Ghaziabad Encounter)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news