आता टाटा ग्रुप बनवणार आयफोन; टाटा समूहाने मानले पीएम मोदींच्या ‘या’ योजनेचे आभार | पुढारी

आता टाटा ग्रुप बनवणार आयफोन; टाटा समूहाने मानले पीएम मोदींच्या 'या' योजनेचे आभार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आता टाटा ग्रुप आयफोनची निर्मिती करणार आहे. टाटा समूहासोबत तैवानची कंपनी विस्ट्रॉनने याबाबतच्या कराराला मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी (दि.२७) सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. मंत्री म्हणाले की, टाटा समूह अडीच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी अॅपल आयफोनचे उत्पादन भारतात सुरू करेल. दरम्यान, यानंतर टाटा समूहाने मानले पीएम मोदींचे आभार मानले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button