Mahua Moitra: ‘महुआने माझा कुत्रा चोरला’ : मोइत्रांच्या एक्स जोडीदाराच्या आरोपानंतर ट्विटरवर नुसता राडाच राडा, कुत्राही आला ट्रेंडमध्ये

Mahua Moitra
Mahua Moitra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर त्या संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात या आरोपांनंतर महुआ सध्या चर्चेत आहेत. या आरोपांनंतर त्या सध्या अनेक वादात सापडल्या आहेत. दरम्यान 'महुआने माझा कुत्रा चोरला' या त्यांच्या एक्स जोडीदाराच्या आरोपानंतर त्या ट्विटरवर पुन्हा चर्चेत आल्या आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण आहे तरी काय? (Mahua Moitra)

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यापासून त्यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्या एक्स जोडीदारासोबतच्या एका भांडणात पुन्हा अडकल्या आहेत. महुआ यांचा एक्स जोडीदार आणि सर्वोच्च न्यायालयाचे विधितज्ज्ञ अनंत देहादराई आणि खासदार महुआ यांच्यात तीन वर्षांचा कुत्रा सध्याच्या वादाचे कारण बनला आहे. 'हेन्री' या कुत्र्याच्या बदल्यात माझी सीबीआय तक्रार आणि पत्रे मागे घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे जय अनंत देहादराई यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केली आहे. तसेच ही X पोस्ट त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना टॅग केली आहे. (Mahua Moitra)

पुढे सर्वोच्च न्यायालयाचे विधितज्ज्ञ जय अनंत देहादराई यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे 'हेन्री' या कुत्र्याच्या बदल्यात सीबीआय केस मागे घेण्याची मागणी करण्यात आली. परंतु मी याला नकार देत, सीबीआयला तपशील देईन असे उत्तर दिले आहे. मेसेंजर पूर्णपणे निर्दोष आहे. परंतु तिच्याबद्दल सर्व काही सांगतो, असे देखील महुआ मोईत्रा यांच्या एक्स जोडीदाराने म्हटले आहे. जय अनंतच्या पत्राच्या आधारे निशिकांत दुबे यांनी महुआवर प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप केला होता. ((Mahua Moitra))

'हेन्री'बाबत महुआ मोईत्रा आणि एक्स जोडीदार यांच्यातील वाद काय आहे?

हेन्री नावाच्या तीन वर्षांच्या रॉटवेलर जातीच्या कुत्र्याच्या ताब्यावरुन महुआ आणि देहद्राई यांच्यात वाद सुरू आहे. हा कुत्रा सध्या महुआ यांच्याकडे आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि महुआचे एक्स जोडीदार जय अनंत देहादराई यांना या कुत्र्याचा ताबा हवा आहे. त्यानुसार या कुत्र्याची किंमत 75 हजार रुपये आहे. महुआ यांच्यावर आरोप करताना देहद्राई म्हणाले, 'संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याच्या प्रकरणात तसेच हिरानंदानी ग्रुपशी असलेल्या संबंधांची माहिती दिल्यास महुआ मोइत्रा यांनी जय अनंत देहादराई यांना हेन्रीचा ताबा देण्याचे मान्य केले आहे, असे आरोप महुआ यांचा एक्स जोडीदार जय अनंत देहादराई यांनी X वरून पोस्ट करत केला आहे.

.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news