पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) गगनयान मोहिमेच्या पहिल्या वाहन चाचणी प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. आज शनिवारी (दि. २१) सकाळी ८ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून गगनयान चाचणी वाहन विकासयानाचे (TV-D1) प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून दिली आहे. (Mission Gaganyaan)
गगनयान वाहन चाचणी प्रक्षेपण श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून होणार आहे. हे प्रक्षेपण अनेक प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल, असे इस्रोने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गगनयान चाचणी प्रक्षेपण इस्रोची अधिकृत वेबसाईट, यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर लाइव्ह पाहता येणार आहे. तसेच दूरदर्शन, द नॅशनल ब्रॉडकास्टर या ठिकाणी गगनयान चाचणीचे प्रक्षेपण पाहता येणार आहे. (Mission Gaganyaan)
"गगनयान" चाचणी वाहन अंतराळयानाचे प्रक्षेपण, म्हणजेच "गगनयान" चाचणी वाहन विकासयानाचे (TV-D1) प्रक्षेपण आज शनिवारी (दि. २१) सकाळी ८ वाजता होणार आहे. इस्रो "गगनयान" मोहिमेचा महत्त्वाचा भाग असलेल्या क्रू एस्केप प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी देखील करेल, परिणामी 2024 पर्यंत मानवरहित आणि मानवीय अंतराळ मोहीमा होतील. ही चाचणी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात केली जाणार आहे. क्रू मॉड्यूल गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाईल. या चाचणीच्या यशामुळे पहिल्या मानवरहित "गगनयान" मोहिमेचा टप्पा निश्चित होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली होती. अंतिम मानवी "गगनयान" अंतराळ मोहिमेपूर्वी, पुढील वर्षी चाचणी उड्डाण होणार आहे, ज्यामध्ये "व्योममित्र" या महिला रोबो अंतराळवीराला नेले जाईल, असे ते म्हणाले. (Mission Gaganyaan)
ISRO वेबसाईट: http://isro.gov.in
ISRO यूट्यूब चॅनल: youtube.com/watch?v=BMig6ZpqrIs
ISRO फेसबुक पेज: https://facebook.com/ISRO
DD National TV: https://www.youtube.com/@DoordarshanNational