TCS म्हणते, ऑफिसला यावं लागेलच ! पण ड्रेसकोडही पाळावा लागेल… | पुढारी

TCS म्हणते, ऑफिसला यावं लागेलच ! पण ड्रेसकोडही पाळावा लागेल...

पुढारी ऑनलाईन : टाटा कन्सल्टन्सी सर्विस म्हणजेच टीसीएसने वर्क फ्रॉम होम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला परत येण्यासंबंधी मेल केला आहे. या मेलमध्ये परत येण्यासंबंधी तर लिहिल आहेच. पण ऑफिस परत जॉइन केल्यानंतर ड्रेस कोड पाळावा लागेल हेही सांगितलं आहे. जागतिक स्तरावरच्या स्टॉकहोल्डर्स योग्य तो प्रभाव पडण्यासाठी ड्रेसकोड पॉलिसी अत्यावश्यक आहे. मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद कक्कड यांनी पाठवलेल्या ईमेलने कर्मचाऱ्यांना योग्य ड्रेस कोडचे पालन करण्यासंबंधीची आठवण करून दिली आहे. यापुढे नमूद करताना ते म्हणाले, अनेक कर्मचारी गेल्या दोन वर्षांत कंपनीत सामील झाले आहेत आणि आतापर्यंत ते दूरस्थपणे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना टीसीएस पद्धतीने एकत्रित करावे लागेल. कंपनीचे ड्रेस कोड पॉलिसी देखील मेलमध्ये हायलाइट करण्यात आली होती.

यावेळी कर्मचाऱ्यांनी कॅज्युअल परिधान करावं असे मेलमध्ये सांगितले आहे. पुरुषांसाठी पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि महिलांसाठी व्यावसायिक पातळीवर शोभतील असे कपडे हा ड्रेस कोड आहे. सोमवार ते गुरुवार असा हा पोशाख आहे. सेमिनार आणि समिट यांसारख्या औपचारिक कार्यक्रमांसाठी तसेच क्लायंटच्या भेटीसाठी हा पेहराव योग्य आहे. फक्त शुक्रवारी स्मार्ट कॅज्युअलला परवानगी आहे.

हेही वाचा :

 

Back to top button