LinkedIn : नोकरी शोधायच्या सोशल मीडियाने दिला ६६८ कर्मचाऱ्यांना नारळ

LinkedIn
LinkedIn
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोकरी शोधून देणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn ने आपल्या ६६८ कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. नोकरी करण्याची मागणी मंदावली असल्यामुळे या वर्षी दुसऱ्यांदा LinkedIn कडून नोकरी कपात करण्यात आली आहे. अभियांत्रिकी, टॅलेंट आणि फायनान्स संबंधित ६६८ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टच्या LinkedIn कडून देण्यात आली आहे.

चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकांनाही नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. २० हजार चांगल्या कर्मचाऱ्यांपैकी ३ टक्के कर्मचाऱ्यांना अनिश्चित आर्थिक दृष्टिकोनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या गमावल्या लागल्या आहेत. एम्प्लॉयमेंट फर्म चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमसच्या म्हणण्यानुसार, या क्षेत्राने वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 141,516 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

LinkedIn जाहिरात विक्रीद्वारे आणि योग्य नोकरीचे उमेदवार शोधण्याचे काम करते. यासाठी व्यावसायिकांकडून LinkedIn मोठ्या प्रमाणात पैसे आकारण्यात येतात. LinkedIn कडून मे महिन्यात विक्री आणि सपोर्ट टीममधील ७१६ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news