चिपळुणात अजितदादा गटाचे आमदार उड्डाणपूल पाहण्यासाठी आले, काही क्षणात घडली मोठी दुर्घटना | पुढारी

चिपळुणात अजितदादा गटाचे आमदार उड्डाणपूल पाहण्यासाठी आले, काही क्षणात घडली मोठी दुर्घटना

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूणमध्ये आज (दि. १६) उड्डाणपूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम हे सुखरुपपणे बचावले. काही सेकंदात सहकाऱ्याना कोसळत असलेल्या पुलाखालून बाहेर काढत स्वतः डांबराच्या पिंपावरून उडी मारत सहकाऱ्यांसह स्वतःचा जीव वाचवला.

बहादूरशेख येथील उड्डाणपूलाला क्रॅक गेल्याने त्याची पहाणी करण्यासाठी आ शेखर निकम राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, जयन्द्रथ खातते, सचिन साडविलकर, समाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, संबंधित यंत्रणेचे अधिकारी आज दुपारी पहाणी करीत होते. उड्डाणपुलाच्या खाली पाहणी केल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी हायवेच्या वरिष्ठांना या बाबत माहिती देऊन आता पुढे काय करावे लागेल याच्या सूचना देऊन या संदर्भात तात्काळ दखल घेऊन येथील धोका टाळावा अन्यथा मोठा अनर्थ घडेल याची कल्पना दिली. त्यानंतर काही सेकंदात ही घटना घडली. सुदैवाने आमदार निकम या घटनेत सुखरुप बचावले.

Back to top button