कोल्हापूर : हेरलेत तंटा मुक्त समिती अध्यक्षपद निवडीवरून गदारोळ; ग्रामसेवकाचा रक्तदाब वाढला | पुढारी

कोल्हापूर : हेरलेत तंटा मुक्त समिती अध्यक्षपद निवडीवरून गदारोळ; ग्रामसेवकाचा रक्तदाब वाढला

हातकणंगले : पुढारी वृत्तसेवा : तंटा मुक्त समिती अध्यक्षपदाच्या निवडीवर हेर्ले येथील ग्रामसभा अतिशय गदारोळात पार पडली. यामध्ये ग्रामविकास अधिकारी बी.एस.कांबळे यांचा रक्तदाब वाढल्याने वातावरण चांगलेच बिघडले .

दरम्यान सरपंच राहुल शेटे यांनी अमरसिंह वड्ड यांची हात उंच करून वाजवी मताने तंटा मुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केल्याने तणाव निर्माण झाला . हातकणगले पोलिस निरीक्षक महादेव तोदले फौजफाट्यासह दाखल झाल्याने वातावरण निवळले .

सोमवारी (दि. १६) सकाळी 11वाजता सरपंच राहुल शेटे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमीक शाळेतच सभेला सुरुवात झाली.तंटा मुक्त समिती अध्यक्षपदासाठी चार जण इच्छुक होते.यापैकी मुनीर जमादार यांनी माघार घेतली.तर मंगेश काशिद,विनोद वड्ड,अमरसिंह वड्ड यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.यावेळी तिन्ही उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच राहुल शेटे,उपसरपंच बख्तियार जमादार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.पण पहिल्यादा प्रत्येक उमेदवार अध्यक्षपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने समर्थकांनी मोठा गोंधळ घातला.यामध्ये ग्रामविकास अधिकारी बी.एस.कांबळे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे निर्माण झाल्यामुळे उपसरपंचासह दहा ग्रामपंचायत सदस्यांनी ही ग्रामसभा तहकूब करावी असे लेखी निवेदन सरपंचांना दिले.व दहा सदस्य तिथून निघून गेले. दरम्यान घटनास्थळी हातकणगले पोलिस निरीक्षक महादेव तोदले फौजफाट्यासह दाखल झाले.त्यांनी ही ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.पण समर्थकांचा गदारोळ सुरूच होता.या गदारोळातच सरपंच राहुल शेटे यांनी तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांना हात उंचावून मतदान करावे असे सांगितले.यावर उमेदवार मंगेश काशीद व विनोद वड्ड यांनी आक्षेप घेऊन गुप्त मतदान पद्धतीने सदरची निवड करावी असे सांगितले . सरपंच राहुल शेटे यांनी हात उंचावून मतदान घेऊन अमरसिंह वड्ड यांची तंटा मुक्त समिती अध्यक्षपदी निवड जाहीर केली.

Back to top button