Gaganyaan Mission : आता मोहीम ‘गगनयान’; ISRO ने जाहीर केली प्रक्षेपणाची तारीख अन् वेळ

Gaganyaan Mission
Gaganyaan Mission

पुढारी ऑनलाईन डेस्क: चांद्रयान-३, सूर्यमोहिमेनंतर आता इस्रोने गगनयान मोहिमेसंदर्भात आज (दि.१६) महत्त्वाची घोषणा केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गगनयान मिशन शनिवारी २१ ऑक्टोबरला सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान प्रक्षेपित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील स्पेस सेंटर श्रीहरिकोटा येथून या गगनयानाचे प्रक्षेपण होणार असल्याचे देखील इस्रोने दिलेल्या माहित स्पष्ट केले आहे. (Gaganyaan Mission)

अमेरिका, रशिया, चीन आदी देशांनी मानवयुक्त यान अवकाशात पाठविले आहे. गगनयानाच्या यशानंतर मानवयुक्त यान पाठविणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. 'चांद्रयान-3'च्या यशामुळे 'इस्रो'मधील शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी आता गगनयानावर लक्ष केंद्रित केले आहे. 'चांद्रयान-3'साठी 'एलव्हीएम-3' अग्निबाणाचा वापर केला आहे. यामुळे गगनयान मोहिमेला बळ मिळाले आहे. याच अग्निबाणाच्या साहाय्याने गगनयानाचे अवकाशात उड्डाण होणार आहे. 'ह्युमन रेटेड एलव्हीएम-3' असे गगनयानासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे नामकरण करण्यात आले आहे. (Gaganyaan Mission)

भारत आता नव्या गगनभरारीसाठी दिमाखात सज्ज आहे. देशाची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या 'गगनयान'साठीची जय्यत तयारी सुरू आहे. यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने आता या मोहिमेच्या चाचणी उड्डाणासाठी पहिले सिम्युलेटेड क्रू मॉड्यूल (एससीएम)  मिळाल्याचे एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. (Gaganyaan Mission)

Gaganyaan Mission: 'गगनयान' मोहिमेतील क्रू मॉड्यूल?

इस्रो'ला 'गगनयान' प्रोजेक्टसाठी सिम्युलेटेड क्रू मॉड्यूल स्ट्रक्चर असेंब्ली मिळाली आहे. ही पहिली स्वदेशी 'एससीएम' असून, ती 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर'ने विकसित केली आहे. तसेच ते मंजीरा मशीन बिल्डर्स प्रायव्हेटने तयार केले आहे. या मॉड्यूलचा वापर अनेक टेस्ट व्हेईकल मिशनसाठी केला जाईल. याअंतर्गत क्रू मॉड्यूलच्या अनेक उपप्रणालींच्या चाचणीसह क्रू एस्केप सिस्टमचे प्रमाणीकरण केले जाईल. तसेच क्रू एस्केप सिस्टम व इतर उपप्रणाली प्रमाणित करण्यासाठी टेस्ट रॉकेट मिशनमध्येही 'एससीएम'चा वापर केला जाईल.

 'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळपटूंना प्रशिक्षण

'इस्रो'च्या मते, 'एससीएम' हे एक अनप्रेशराईज्ड क्रू मॉड्यूल आहे. ते आकार, बाह्य मोल्ड लाईन, पॅराशूट सिस्टम व वास्तविक चालक दल मिशन कॉन्फिगरेशनच्या 'पायरोस'सारख्या प्रमुख सिस्टमच्या इंटरफेसचे अनुकरण करते. 'इस्रो'ने सांगितले की, क्रू मॉड्यूल हे एक प्रेशराईज्ड कॅप्सूल आहे. त्या माध्यमातून 'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळपटूंना प्रशिक्षण दिले जाते. 'इस्रो'ची चालू वर्षाच्या अखेरीस एक टेस्ट रॉकेट प्रक्षेपित करण्याची योजना आहे. सध्या 'गगनयान' मोहिमेसाठी चार भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे देखील इस्रोकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news