Navratri 2023: पाकव्याप्त काश्मीरमध्ये फाळणीनंतर पहिल्यांदाच शारदा मंदिरात नवरात्र उत्सव

Navratri 2023: पाकव्याप्त काश्मीरमध्ये फाळणीनंतर पहिल्यांदाच शारदा मंदिरात नवरात्र उत्सव

पुढारी ऑनलाईन डेस्क : फाळणीनंतर पहिल्यांदाच काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LOC) स्थित टिटवाल भागात नव्याने बांधलेल्या शारदा मंदिरात शारदीय नवरात्रीची पूजा आज (दि.१६) झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन आशीर्वाद घेतले. हा ऐतिहासिक क्षण होता. यामध्ये हंपीचे स्वामी गोविंदानंद सरस्वती आपल्या अनुयायांसह येथे पोहोचले आहेत. यावेळी काश्मिरी पंडित आणि प्रसिद्ध नाट्य कलाकार एमके रैना ज्यांनी काश्मीर फाइल्स चित्रपटात काम केले आहे त्याही उपस्थित होत्या. (Navratri 2023)

ऐतिहासिक क्षण….

"फाळणीनंतर पहिल्यांदाच शारदा मंदिर एलओसी येथे नवरात्रीची पूजा करणे हा पुन्हा एक ऐतिहासिक क्षण होता. काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LOC)टिटवाल भागात येथे अस्तित्वात असलेले हे मंदिर आहे. हे मंदिर आणि गुरुद्वारा १९४७ मध्ये आदिवासींच्या हल्ल्यात जाळून टाकण्यात आले होते. त्याच धर्तीवर एक नवीन मंदिर आणि गुरुद्वारा उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते २३ मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी मंदिरात पंचलोह मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी, शारदा मातेची मूर्ती कर्नाटकातील शृंगेरी येथून उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या टिटवालपर्यंत नेण्यासाठी यात्रा सुरू करण्यात आली होती. फाळणीनंतर गेल्या ७५ वर्षात यंदा प्रथमच येथे झालेल्या या उत्सवात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

Navratri 2023 : पहिल्या दिवशी ५० हजारहून अधिक भाविक

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ५० हजार भाविक कटरा येथील माँ वैष्णो देवी भवनात दर्शनासाठी आले होते. भाविकांची संख्या लक्षात घेऊन श्राइन बोर्डाने पहाटे ४ वाजता सर्व ३७ नोंदणी केंद्रे उघडली. जयघोषात दुपारी 2 वाजेपर्यंत 32 हजार नोंदणी तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत 50 हजार नोंदणी झाली होती. भाविकांमध्ये दर्शनाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news