Navratri 2023 : प्रतापगडावरील भवानीमाता मंदिर उजळले | पुढारी

Navratri 2023 : प्रतापगडावरील भवानीमाता मंदिर उजळले

प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा :  अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी अष्टभुजा किल्ले प्रतापगडावरील श्री आई भवानी मातेच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. आई भवानी माता मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (Navratri 2023 )

किल्ले प्रतापगडावर श्री भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यावर्षी 364 वर्षे पूर्ण होत आहेत. नवरात्रौत्सवाचे आयोजन राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. किल्ले प्रतापगडावर विधिपूर्वक दोन घट बसवण्यात आले. नवरात्रात नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा, गोंधळ आणि पुराण पाठ होणार आहेत. चौथ्या माळेला रात्री मशाल महोत्सव होणार आहे.
नवरात्राच्या पाचव्या माळेला सकाळी शिवप्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने पालखी सोहळा होईल. तर, आठव्या माळेला अष्टमीनिमित्त घागरी फुंकणे हा कार्यक्रम असून 9 व्या माळेला नवचंडी यज्ञ होणार आहे. (Navratri 2023 )

हा सोहळा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडतो. विजयादशमीला सायंकाळी पालखी मिरवणूक सोहळा निघणार आहे. येथे नवरात्रौत्सवासाठी येणार्‍या लाखो भाविकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. देवीचे सेवेकरी प्रतापगडचे किल्लेदार म्हणजे हवालदार, फडणीस, हडप, पुराणिक, मोरे, उतेकर, जंगम, कासुर्डे, जाधव तसेच दुर्गाभक्त सज्ज आहेत. (Navratri 2023 )

हेही वाचा : 

 

Back to top button