Best Whiskey in the World | भारताची Indri whiskey ठरली जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की, काय खास आहे त्यात?

Best Whiskey in the World: Indri whisky
Best Whiskey in the World: Indri whisky

पुढारी ऑनलाईन : भारताच्या 'इंद्री व्हिस्की'ने जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट व्हिस्की म्हणून स्थान मिळवले आहे. व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्स- 2023 मध्ये भारताच्या 'इंद्री व्हिस्की'ला जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की (Best Whiskey in the World)  म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील व्हिस्कीसाठी ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. (Indri whisky)

द व्हिस्कीज् ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्स हा कार्यक्रम दरवर्षी जागतिक स्तरावर आयोजित करण्यात येतो. यामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून १०० हून अधिक व्हिस्की ब्रँड सहभागी झाले होते. दरम्यान जागतिक स्तरावरील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित व्हिस्कीची चव घेण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारताच्या इंद्री व्हिस्कीची जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट ब्रॅंड म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताच्या इंद्री व्हिस्कीने स्कॉच, बोरबॉन, कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटिश सिंगल माल्ट्ससह या देशातील व्हिस्कींना मागे टाकत जागतिक स्तरावर पहिले स्थान मिळवले. (Best Whiskey in the World)

इंद्री हा भारतातील हरियाणा येथील पिकॅडिली (Piccadily Group) समुहाचा स्थानिक ब्रॅंड आहे. २०२१ मध्ये भारतातील पहिली ट्रिपल-बॅरल सिंगल माल्ट व्हिस्की, इंद्री-त्रिनी लाँच करून या समुहाचा प्रवास सुरू झाला. द संडे गार्डियनच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत, इंद्रीने 14 आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. (Best Whiskey in the World)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news