Gogi Gang Delhi | गोगी गँगच्या शार्पशूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक | पुढारी

Gogi Gang Delhi | गोगी गँगच्या शार्पशूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. गोगी टोळीचा शार्पशूटर आश्रू उर्फ लालू आणि आझरू याला अटक केली आहे. दरम्यान, तो अनेक गुन्ह्यांमध्ये वॉटेंड असल्याचेदेखील दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Sharp-Shooter of the Gogi Gang)

एएनआयने दिलेल्या वृत्तात सांगितले आहे, आश्रू उर्फ लालू (२३) हा दिनेश कराला-योगेश टुंडांस् यांच्या टोळीशी संबंधित आहे. तो शार्पशूटर असून, अनेक गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉटेंड होता. त्याला दिल्ली गुन्हे शाखेने भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३०७ आणि ३४ आणि कलम २५ आणि २७ यासह अनेक कलमांखाली हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. दिल्लीच्या बुद्ध विहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. (Sharp-Shooter of the Gogi Gang)

आरोपीला यापूर्वी आयपीसीच्या कलम ३०७ आणि ३४ आणि आर्म्स ॲक्टच्या २५, २४ आणि ५९ अंतर्गत दिल्लीतील अलीपूर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाच्या दुसर्‍या खटल्यात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तो अधिकाऱ्यांसमोर हजर झाला नाही. नंतर आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करण्यात आले. (Sharp-Shooter of the Gogi Gang)

हेही वाचा:

Back to top button