Asian Games 2023 : ‘ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी टी-२० योग्य फॉरमॅट’- व्हीव्हीएस लक्ष्मण | पुढारी

Asian Games 2023 : 'ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी टी-२० योग्य फॉरमॅट'- व्हीव्हीएस लक्ष्मण

पुढारी ऑनलाईन डेस्क : “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी टी-२० फॉरमॅट हा एक योग्य फॉरमॅट आहे. भविष्यात क्रिकेट या खेळाचा भाग बनेल; सर्व क्रिकेटपटूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदके जिंकण्याची संधी मिळेल,” असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी व्यक्त केला आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघासोबत आहेत. ३ ऑक्टोबर रोजी उपांत्यपूर्व फेरीत भारताची सलामीची लढत होणार आहे.

पीव्ही सिंधूने हाँगझोऊमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणची घेतली भेट

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने एशियन गेम्स २०२३ दरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर पीव्ही सिंधूने तिच्या सोशल मीडियावर लक्ष्मणसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे लक्ष्मणने कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या २८१ धावांच्या ऐतिहासिक कसोटी खेळीचा उल्लेखही सिंधूने केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PV Sindhu (@pvsindhu1)

Back to top button