Mahatma Gandhi jayanti 2023 : महात्मा गांधींजींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया : पंतप्रधान नरेंद्र माेदी | पुढारी

Mahatma Gandhi jayanti 2023 : महात्मा गांधींजींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया : पंतप्रधान नरेंद्र माेदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महात्मा गांधी यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत त्यांना नमन केलं आहे. पंतप्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे, संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करते.” (Mahatma Gandhi jayanti 2023)

Mahatma Gandhi jayanti 2023 : महात्मा गांधींची शिकवण कालातीत

महात्मा गांधी यांच्या जयंतीनीमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत त्यांना नमन  केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की,”गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना नमन करतो. त्यांची कालातीत शिकवण आमचा मार्ग उजळत राहते. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे, संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करते. त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. त्यांचे विचार प्रत्येक तरुणाला त्यांनी स्वप्न पाहिलेल्या बदलाचे दूत बनू द्या, सर्वत्र एकता आणि सुसंवाद वाढवा.”

उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनीही महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त राजघाटावर आदरांजली वाहिली.

हेही वाचा :

Back to top button