महात्मा गांधी यांच्‍यावरील पहावे असे ८ चित्रपट  | पुढारी

महात्मा गांधी यांच्‍यावरील पहावे असे ८ चित्रपट 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज २ ऑक्‍टोबरला जयंती. महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर अनेक चित्रपट आले. या चित्रपटांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना महात्मा गांधी यांच्‍याविषयी जाणून घेता आले. त्‍यांच्‍या जीवनावरील या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांविषयी जाणून घेऊया. 

महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर सर्वात महत्त्‍वाच्‍या चित्रपटाची निर्मिती रिचर्ड एटनबरोने केली. १९८२ मध्‍ये ‘गांधी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटात हॉलिवूड कलाकार बेन किंस्ले यांनी गांधीजी यांची व्‍यक्‍तीरेखा साकारली होती. ‘गांधी’ चित्रपटाला ऑस्कर ॲवॉर्ड देखील मिळाला होता.

Gandhi (Film) - TV Tropes

श्याम बेनेगल यांनी महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर ‘द मेकिंग ऑफ गांधी’ चित्रपट आणला. चित्रपटात गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा रजित कपूर यांनी साकारली होती. चित्रपटात मोहनदास करमचंद गांधी ते महात्‍मा बनण्‍यापर्यंतचा प्रवास दाखवण्‍यात आला. १९९६ मध्‍ये हा चित्रपट रिलीज झाला होता. 

Mahatma gandhi death anniversary and films based on gandhi ji life and  jouney like gandhi and hey ram

२००७ मध्‍ये फिरोज अब्बास मस्तान यांच्‍या दिग्‍दर्शनाखाली ‘गांधी माय फादर’ रिलीज झाला. या चित्रपटात महात्मा गांधी यांची व्‍यक्‍तिरेखा दर्शन जरीवाला यांनी साकारली होती. हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्‍यांचा मुलगा हरीलाल यांच्‍या नात्‍यांवर आधारित होता.

Gandhi My Father

महात्मा गांधी यांच्‍या हत्येच्‍या प्रसंगावर कमल हासन यांनी ‘हे राम’ चित्रपट बनवला. चित्रपट २००० मध्‍ये रिलीज झाला होता. चित्रपटात महात्मा गांधी यांची व्‍यक्‍तिरेखा नसीरुद्दीन शाह यांनी साकारली होती. 

Hey Ram'' turns 16, Kamal Haasan touched - Bollywood Bubble

जब्बर पटेल यांनी २००० मध्‍ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपट आणला. चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि महात्मा गांधी यांच्‍यासोबत असलेलं त्‍यांचं नातं दर्शवण्‍यात आलं होतं. मोहन गोखले यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा साकारली होती. 

राजकुमार हिरानी यांनी २००६ मध्‍ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपट आणला. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी म. गांधीजींची व्‍यक्‍तिेरखा साकारली होती.  

gandhigiri: A decade later, Munna Bhai's Gandhigiri still a hit | Delhi  News - Times of India

सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या आयुष्‍यावर आधारित ‘सरदार’ चित्रपटाची निर्मिती १९९३ मध्‍ये केतन मेहता यांनी केली होती. चित्रपटात गांधी आणि सरदार पटेल यांचं नातं कसं होतं, हे दर्शवण्‍यात आलं. गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा अन्नू कपूर यांनी साकारली होती. तर सरदार पटेल यांची व्‍यक्‍तिरेखा परेश रावल यांनी साकारली होती. 

Sardar (1993 film) - Wikipedia

‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका होती. आपणच गांधीजींची हत्‍या केली आहे, असे त्‍या व्‍यक्‍तीला (अनुपम) वाटत असते, अशी कथा चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. २००५ मध्‍ये जहनु बरुआने हा चित्रपट आणला होता. 

Maine Gandhi Ko Nahin Mara (2005) - IMDb

Back to top button