Surgical strike : घरात घुसून शिकवला धडा ! सर्जिकल स्ट्राइकची गौरवशाली 7 वर्षं | पुढारी

Surgical strike : घरात घुसून शिकवला धडा ! सर्जिकल स्ट्राइकची गौरवशाली 7 वर्षं

पुढारी ऑनलाईन : 2016 चा 29 सप्टेंबर हा दिवस आजही प्रत्येक भारतीयच्या अंगावर अभिमानाचे रोमांच उभे करतो. याला कारण आहे यादिवशी झालेला सर्जिकल स्ट्राइक. मुळात जगाची सकाळच भारतीय सैन्याच्या या दैदीप्यमान कामगिरीने झाली. याच दिवशी भारतीय जवानांनी पाक अधिकृत काश्मिरमध्ये 3 किलोमीटर आत शिरकाव करत पाकिस्तानची झोप उडवली होती.
सैन्याने यावेळी दहशवाद्यांची ठिकाणी तर उद्ध्वस्त केलीच याशिवाय पन्नासहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं.

उरीचा घेतला बदला….

जम्मूतील उरी येथील स्थानिक सैन्य मुख्यालयावर हल्ला करून दहशतवाद्यांनी जवळपास 18 सैनिकांना ठार केलं होतं. यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशवादीदेखील मृत्युमुखी पडले होते. देशाच्या 18 सैनिकांचे हे बलिदान वाया जाऊ न देता. भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइकद्वारे याचा बदला घेतला.

28 सप्टेंबरची रात्र ठरली निर्णायक…

28 सप्टेंबर 2016 च्या रात्री भारतीय सैन्याच्या पॅरा ट्रूपर्सची एक तुकडी पाकिस्तानला मागमूसही लागू न देता पीओकेमध्ये घुसली. रात्री 12. 30 वाजता भारतीय सैन्याने पीओकेमध्ये प्रवेश केला. भारतीय उपग्रहांची या कामी मोठी मदत झाली. एलओसीपासून काही अंतर चालत सैनिकांनी एकाच वेळी तीन ठिकाणी स्ट्राइक केला. दहशतवाद्यांच एक लॉंचपॅडही यावेळी उद्ध्वस्त करण्यात आलं. केवळ 4 तासात भारतीय जवानांनी मिशन फत्ते करत पहाटे 4.30 वाजता भारतीय सैन्याच्या ताकदीचा जगाला प्रत्यय आणून दिला.

हेही वाचा :

Back to top button