दोन हजारांच्‍या नोटा बदलीची मुदत ३० सप्‍टेंबरला संपणार, त्‍यानंतर काय होणार? | पुढारी

दोन हजारांच्‍या नोटा बदलीची मुदत ३० सप्‍टेंबरला संपणार, त्‍यानंतर काय होणार?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दोन हजार रुपयांची नोट बँकांमध्‍ये जमा करण्‍याची आणि बदलण्‍याची अंतिम मुदत ३० सप्‍टेंबर रोजी संपणार आहे. ही मूदत संपल्‍यानंतर काय होणार, या नोटाचे काय केले जाणार कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) 30 सप्टेंबरनंतर दोन हजार रुपयांच्‍या नोटा स्वीकारणे बंद करणार आहे. ( Exchange Rs 2,000 notes ) त्‍यानंतर काय होईल? याविषयी माहिती घेवूया…

‘आरबीआय’ने मे २०२३ मध्‍ये दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्‍याची घोषणा केली होती. क्‍लीन नोट पॉलीसीचा भाग म्‍हणून हा निर्णय घेण्‍यात आला. तसेच दोन हजार रुपयांची नोट बँकांमध्‍ये जमा करण्‍याची आणि बदलण्‍याची अंतिम मुदत ३० सप्‍टेंबर असेल, असेही स्‍पष्‍ट केले होते. तसेच बँकांमध्ये जमा केलेल्या प्रमाणाच्या नोटांचा आधारावर रु. 2,000 च्या नोटांची भविष्यातील स्थिती निश्चित करेल. ( Exchange Rs 2,000 notes )

दोन हजार रुपयांच्‍या नोटाचे ३१ ऑगस्‍ट २०२३ पर्यंत एकूण मूल्‍य ३.३२ लाख कोटी रुपये१ सप्‍टेंबर २०२३ रोजी आरबीआयने आपल्‍या अहवालात नमूद केले होते की, ३१ ऑगस्‍ट २०२३ पर्यंत चलनातून परत मिळालेल्‍या दोन हजार रुपयांच्‍या नोटांचे एकूण मूल्‍य हे ३.३२ लाख कोटी रुपये इतके आहे. तसेच ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत, दोन हजार रुपयांच्या फक्त ०.२४ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. हे सूचित करते की १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या ९३ टक्के नोटा बदलून किंवा खात्यात ठेवीद्वारे बँकांमध्ये परत आल्या आहेत.

‘आरबीआय’कडून पुढील अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

RBI १ ऑक्टोबर रोजी दोन हजार नोटांबाबत एक अपडेट प्रदान करेल, ज्यामध्ये उर्वरित 2,000 रुपयांच्या नोटांच्या भविष्याबद्दल स्पष्टीकरण समाविष्ट असू शकते, असे मानले जात आहे. दोन हजार रुपयांच्‍या नोटांपैकी 90 टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्याचे लक्षात घेता, रिझव्‍‌र्ह बँकेकडून या चलनी नोटा यापुढे कायदेशीर निविदा मानल्या जाणार की नाही याबाबत भूमिका स्‍पष्‍ट करणार आहेत.  मात्र, ‘आरबीआय’कडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button