Ajit Pawar : दाेन हजारांच्या नोट बंदीवर अजित पवार म्हणाले, “सारखे निर्णय…”

Ajit Pawar : दाेन हजारांच्या नोट बंदीवर अजित पवार म्हणाले, “सारखे निर्णय…”

पुढारी ऑनलाईन डेस्क :  "सारखे सारखे निर्णय बदलले जातात. अचानक दाेन हजारांच्या नोट बंद करण्याचा फतवा काढला जाताे. नोटाबंदी करण्याच कारण काय आहे? हे आरबीआयने सांगावे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज ( दि. २०) माध्यमांशी बोलताना व्‍यक्‍त केले. (Ajit Pawar) एका खासगी कार्यक्रमानिमित्त काेल्‍हापूरमध्‍ये आले असता ते माध्‍यमांशी बाेलत हाेते.

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या नोटांची छपाई बंद केली जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी देण्यात आली आहे. दोन हजाराच्या नोटा बँकांत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Ajit Pawar : नोटाबंदी करण्याच कारण काय?

या वेळी अजित पवार म्हणाले की, सारखे सारखे निर्णय बदलले जातात. अचानक दाेन हजारांच्या नोट बंद करण्याचा फतवा काढला जाताे. नोटाबंदी करण्याचे कारण काय आहे? हे आरबीआयने सांगावे.

शुक्रवारी (दि.१९) रात्री अजित पवार यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कोल्हापुरात आगमन झाले. शनिवारी (दि.२०) सकाळी शासकीय विश्रामगृहावर पवार पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यानंतर दुपारी अडीच वाजता धैर्यप्रसाद हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ते असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. तेथून ते बारामतीकडे रवाना होणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news