छत्तीसगडच्या सुकमा येथे CRPF जवानाचा सहकाऱ्यांवरच गोळीबार

छत्तीसगडच्या सुकमा येथे CRPF जवानाचा सहकाऱ्यांवरच गोळीबार
Published on
Updated on

छत्तीसगडच्या सुकमा येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बलाच्या एका जवानाने आपल्या सोबत असणाऱ्या सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत चार जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. यातील एक जवान गंभीर जखमी आहे.

जखमी असलेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती CRPF कडून देण्यात आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ३.२५ वाजता घडली.

या घटनेबद्दल CRPF ने दु:ख व्यक्त केले आहे. सीआरपीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, "जवान रितेश रंजनने मरीगुडा पोलिस स्टेशन अंतर्गत लिंगापल्ली येथे तैनात असलेल्या कंपनीच्या जवानांवर गोळीबार केला. या घटनेत सात जवान जखमी झाले. जखमींना तातडीने भद्राचलम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चार जवानांना मृत घोषित केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news