Eco-Friendly Ganesh Chaturthi: सूरतमधील ‘या’ महिलेने साबणापासून तयार केली इकोफ्रेंडली गणेशमूर्ती | पुढारी

Eco-Friendly Ganesh Chaturthi: सूरतमधील 'या' महिलेने साबणापासून तयार केली इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क: आज गणेशचतुर्थी. जगभरात गणरायचे मोठ्या थाटामाटात आगमन होत आहे. बहुतांशी ठिकाणी घरगुती तर काही ठिकाणी सामुहिक गणेशोत्सव साजरा होत आहे. काहीजण पर्यावरणाच्या दृष्टीने पुरक शाडू आणि कागदी गणपतीला प्राधान्य देत आहेत. अशाचप्रकारे गुजरातमधील सूरत येथील एका महिलेने साबणापासून गणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती तयार केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Eco-Friendly Ganesh Chaturthi)

सूरतमधील डॉ. अदिती मित्तल यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे आहे की, मी गेल्या ६ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवत आहे. यावेळी मी स्वच्छता अभियानाच्या थीमवर साबणाने गणेशाची मूर्ती बनवली आहे. मी चांद्रयान आणि शिवशक्ती पॉइंट देखील बनवले आहेत. ही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्यासाठी एकूण २६६५ किलो साबण वापरला आहे. मी ही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती एकटीने बनवली आहे आणि ती बनवायला मला एकूण ७ दिवस लागले असल्याचे देखील डॉ. अदिती यांनी म्हटले आहे. (Eco-Friendly Ganesh Chaturthi)

हेही वाचा:

Back to top button