Encounter in J&K: जम्मू काश्मीरमध्ये मोठी संयुक्त कारवाई; ३ दहशतवाद्यांचा खात्मा- लष्कराची माहिती | पुढारी

Encounter in J&K: जम्मू काश्मीरमध्ये मोठी संयुक्त कारवाई; ३ दहशतवाद्यांचा खात्मा- लष्कराची माहिती

पुढारी ऑनलाईन: गेल्या चार दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील बारामुल्लाच्या उरी भागात जोरदार चकमक सुरू आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या जोरदार चकमकीत (बुधवारी, १३ सप्टेंबर) भारताचे ३ अधिकारी आणि १ जवान शहिद झाले. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ 3 दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे संयुक्त कारवाईत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामधील २ दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. परंतु तिसरा दहशतवादी मारला गेला असून, तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह काढण्यात येत असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Encounter in J&K)

संंबंधित बातम्या

एएनआयने म्हटले आहे की, भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी जम्मू काश्मीरमधील उरी भागात संयुक्त कारवाई करत दहशतावाद्यांचा खात्मा केला. या संयुक्त कारवाईत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तसेच त्यांचे मृतदेह देखील सापडले आहेत. परंतु पाक पोस्टजवळील LOC या नियंत्रण रेषेवर मृतदेह असल्याने तो काढण्यात व्यत्यय येत असून, लष्कराची कारवाई सुरू असल्याचेही भारतीय लष्कराने म्हटले आहे. (Encounter in J&K)

भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात सुरू असलेल्या चकमकीत बुधवारी(दि.१३ सप्टेंबर) पहिल्या दिवशी १९ आरआर सीओ कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष ढोणक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट हे भारतीय जवान शहीद झाले. यानंतर जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी काल दुपारी पोलीस महासंचालक कोकरनाग येथे पोहोचले असून, खोऱ्यातील दहशतवादाचा नायनाट केला जाईल, असे म्हटले आहे. (Encounter in J&K)

हेही वाचा:

Back to top button