अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष | पुढारी

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. त्यासाठी श्री रामजन्मभूमीच्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष व शिल्प सापडले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ट्विट करून ही माहिती दिली. उत्खननात अनेक मूर्ती आणि खांब सापडल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. यासोबतच जानेवारी २०२४ मध्ये अभिषेक करण्याचीही तयारी सुरू आहे. त्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात आहे. २०१९ मध्ये राम मंदिराबाबत निर्णय झाल्यापासून राम नगरी सातत्याने चर्चेत आहे. राम मंदिराच्या उभारणीसोबतच सुमारे ३२ हजार कोटी रुपयांच्या विकास योजनांवर काम सुरू आहे. शहरात मोठे विमानतळही बांधले जात आहे. मंदिराचे बांधकाम सुरू होताच येथे मोठ्या संख्येने रामभक्त येऊ लागले.

श्री रामजन्मभूमी ट्रस्ट वेळोवेळी मंदिराच्या बांधकामाची छायाचित्रे प्रसिद्ध करत असते. मंगळवारी (दि.१२) रामजन्मभूमी येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मंदिराचे अवशेषांचा फोटो शेअर केला आहे. त्यात अनेक पुतळे आणि खांबांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

Back to top button