Maharashtra Rain Update : राज्यात येत्या ४८ तासांत पुन्हा जोरदार पाऊस; ‘या’ दिवशी मुसळधार | पुढारी

Maharashtra Rain Update : राज्यात येत्या ४८ तासांत पुन्हा जोरदार पाऊस; ‘या’ दिवशी मुसळधार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 13 ते 16 सप्टेंबरदरम्यान कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. उत्तरेत पश्चिमी चक्रवाताची स्थिती असल्याने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागांत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होत आहे; तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तामिळनाडू ते आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातही पुन्हा पाऊस वाढणार आहे. विदर्भ व कोकणात 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, पावसाची तीव्रता ही 14 सप्टेंबरपर्यंत, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काहीशी कमी राहील. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार, तर नाशिक ते कोल्हापूरपर्यंतच्या 5 जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपात पाऊस पडेल.

‘या’ दिवसांत पडणार मुसळधार

कोकण : 13 ते 16 सप्टेंबर
विदर्भ : 13 ते 16 सप्टेंबर
मध्य महाराष्ट्र : 15 व 16 सप्टेंबर
मराठवाडा : 15 व 16

हेही वाचा

अहमदनगर : पोलिसांचा यंदा ‘संवाद गणेशभक्तांशी’; एसपी राकेश ओला यांंची माहिती

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निवडणुकांचे वेध

मृत्यूच्या 27 मिनिटांनंतर ‘ती’ पुन्हा झाली जिवंत!

Back to top button