Breaking Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा मृत्यू

Rajasthan accident
Rajasthan accident
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Breaking Rajasthan Accident : राजस्थानमधील भरतपूर येथे बुधवारी सकाळी भीषण रस्ता अपघात घडला. येथे गुजरातहून यूपीकडे जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसला एका ट्रकने मागून धडक दिली. हा अपघात झाला तेव्हा बस रस्त्याच्या कडेला उभी होती, असे वृत्त आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातील मथुरा येथे येत असताना आग्रा-जयपूर महामार्गावर नादबाईजवळ थांबली.

एएनआयच्या 'X' वरील पोस्टनुसार भरतपूर जिल्ह्यातील हंत्राजवळ जयपूर-आग्रा महामार्गावर एका ट्रेलर वाहनाने बसला धडक दिल्याने 11 जण ठार आणि 12 जखमी झाले, अशी माहिती भरतपूरचे एसपी मृदुल कचावा यांनी दिली. बसमधील प्रवासी गुजरातमधील भावनगरहून उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जात होते. जखमींना दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयातील दृश्ये एएनआयने पोस्ट केली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news