Bharat Saudi Europe Economic Corridor : भारत-सौदी-युरोप आर्थिक कॉरिडॉर 6 हजार कि.मी.चा

Bharat Saudi Europe Economic Corridor :
Bharat Saudi Europe Economic Corridor :

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : Bharat Saudi Europe Economic Corridor : भारताला सौदी अरेबिया व अमेरिकेदरम्यान अंतर पडू द्यायचे नाही. कारण त्यामुळे चीनला मध्य-पूर्वेतील देशांत ढवळाढवळ करण्याची आयतीच व जास्तीची संधी मिळेल. चीनला हेच हवे आहे. इराण आणि सौदीतील मतभेद दूर व्हावेत, म्हणून याच उद्देशाने चीनने मध्यस्थीचा शाहजोगपणा केला होता. त्यावर कडी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि युरोपियन महासंघाच्या नेत्यांसोबत नवीन आर्थिक कॉरिडॉरबद्दल करार केला.

हा करार चीनला सणसणीत चपराक ठरलेला आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) या जगावर अधिपत्य गाजविण्याच्या उद्दिष्टाने चीनने सुरू केलेल्या योजनेला मोदींची ही योजना भक्कम पर्याय ठरणार आहे. योजनेंतर्गत भारत-मध्यपूर्वेला सागरी मार्गाने जोडला जाईल. कॉरिडॉरच्या बाजूने ऑईल-गॅस पाईपलाईन आणि ऑप्टिकल फायबर लाईनचे जाळेही उभारले जाईल. आशिया, सौदीसह आखाती देश आणि युरोपातील संपर्काला गती येईल. या संपूर्ण भागाच्या आर्थिक विकासातही ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

Bharat Saudi Europe Economic Corridor : योजनेचे स्वरूप, सहभागी देश

* रेल्वे, जहाज-रेल्वे ट्रान्झिट नेटवर्क आणि रस्ते असे मिश्र स्वरूप या कॉरिडॉरचे असेल.
* नुकतेच इटली या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पापासून स्वत:ला वेगळे करून घेतले आहे.
* 8 देश सदस्य : भारत, अमेरिका, संयुक्तअरब अमिरात, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली व युरोपीय युनियन. इस्रायल, जॉर्डनलाही कॉरिडॉरचा मोठा लाभ होईल.

Bharat Saudi Europe Economic Corridor : भारताला हे मोठे फायदे

भारत आधीच 7 हजार 200 कि.मी.च्या रशिया-इराण आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरचा घटक आहे. युरोपपर्यंत भारताला हा दुसरा कॉरिडॉर उपलब्ध झालेला असेल.
नवा कॉरिडॉर आग्नेय आशियापासून आखाती देश, पश्चिम आशियापासून ते युरोपपर्यंत व्यापार वृद्धीला उपयुक्त ठरेल.
नवीन कॉरिडॉर हा सध्याच्या पर्यायाच्या तुलनेत जलद आणि स्वस्त असेल. ग्रीन कॉरिडॉर म्हणून तो विकसित केला जाईल.

Bharat Saudi Europe Economic Corridor : दोन स्वतंत्र कॉरिडॉर

1) पूर्व कॉरिडॉर : भारताला पश्चिम आशिया-मध्य पूर्वेशी जोडेल.
2) उत्तर कॉरिडॉर : पश्चिम आशिया/मध्य पूर्वेला युरोपशी जोडेल. यात एक रेल्वेलाईनही असेल. क्रॉस-बॉर्डर जहाज ते रेल्वे ट्रान्झिट नेटवर्क ही लाईन उपलब्ध करून देईल.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news