‘बागेश्वर धाम’चे धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी, बरेलीतील तरुणाला अटक | पुढारी

'बागेश्वर धाम'चे धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी, बरेलीतील तरुणाला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बागेश्वर धामचे ( Bageshwar Dham) बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी मिळाला आहे. या प्रकरणी बरेलीच्या हाफिजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खाटा गावातील अनस अन्सारी या तरुणाने इंस्टाग्रामवर धमकीचे मेसेज पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

अनस अन्सारीने इंस्टाग्रामवर धमकीचे संदेश पाठवले होते. या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर हिंदू संघटनांनी अन्‍सारीवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याने धीरेंद्र शास्त्री यांना धमकी दिल्याची कबुली दिली आहे.

हाफिजगंज पोलिस स्टेशनचे अधिकारी चेतराम वर्मा यांनी सांगितले की, आरोपी अनस अन्सारीच्या चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. यामध्ये त्याने आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. तक्रारीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली दिली आहे.

ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांना धमकावल्याचा आरोप

आरोपी तरुणाच्या चॅटचा स्क्रीनशॉट अनेकांनी ट्विट केला आहे. बाबा असा शब्द घेऊन मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अनेकांनी केला. तपासादरम्यान आरोपींनी मुख्यमंत्र्यांना धमकावल्याचा इन्कार केल्याचेही वर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा :   

 

Back to top button