अभिनेता ते नेता… जाणून घ्या सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या उदयनिधींचा प्रवास

Udaynidhi Stalin
Udaynidhi Stalin
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम् ( द्रमुक ) पक्षाचे सर्वेसर्वा एम के स्टालिन यांचे पूत्र ही त्‍यांची मूळ ओळख.  सध्‍या ते तामिळनाडूचे  युवा कल्याण-खेळ विकास मंत्री आहेत. त्‍याचे नाव आहे उदयनिधी स्टॅलिन. त्‍यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आणि राष्‍ट्रीय पातळीवर त्‍यांचे नाव चर्चेत आहेत. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने विराेधी पक्षांच्‍या 'इंडिया' आघाडीवर हल्‍लाबाेल केला आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्यावर भाजपाने त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. जाणून घेवूया उदयनिधी स्‍टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्‍या आजवरच्‍या प्रवासाविषयी…

Udhayanidhi Stalin : काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन

उदयनिधी स्टॅलिन हे एका कार्यक्रमात बाेलताना सनातन धर्माबाबत केलेल्‍या वादग्रस्‍त वक्तव्यानंतर माेठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. शनिवारी (दि.२) चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात त्‍यांनी सनातन धर्मावर भाष्य केले होते. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली.  ते म्हणाले होते की, "काही गोष्टींना विरोध करता येत नाही, फक्त त्या संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. आपल्याला हे संपवायचे आहे. अशाप्रकारे सनातनला संपवायचे आहे, "सनातनाला विरोध करण्यापेक्षा ते नष्ट केले पाहिजे. सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे. ते सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे," त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.

उदयनिधींच्या वक्तव्यावर खुलासा

उदयनिधी यांनी शनिवारी (दि.२) चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात सनातन धर्मावर भाष्य केले होते. मात्र, नंतर त्यांनी आपल्या  'X' खात्यावरुन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते, "मी सनातन धर्माचे पालन करणार्‍यांच्या नरसंहाराचे आवाहन केलेले नाही. सनातन धर्माचे पालन करणाऱ्या लोकांचा नरसंहार मी कधीही पुकारला नाही. सनातन धर्म हे धर्म आणि जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणारे तत्व आहे. सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करणे म्हणजे मानवता आणि मानवी समता.होय. मी केलेल्या वक्तव्या संदर्भात ठाम आहे. . मी सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे." पुढे स्पष्टीकरण देत असताना ते म्हणाले की, "माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी मी तयार आहे, मग ते न्यायालय असो किंवा लोकांच्या न्यायालयात"

Udhayanidhi Stalin : कोण आहेत उदयनिधी स्टॅलिन?

उदयनिधी स्टॅलिन यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. ते तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील दिग्गज नेते दिवंगत एम करुणानिधी यांचे नातू आहेत. उदयनिधी यांचे वडील एमके स्टॅलिन हे द्रमुक पक्षाचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते द्रमुकच्या युवा शाखेचे राज्य सचिव आहेत. उदयनिधी यांना गेल्या वर्षी स्टॅलिन सरकारमध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री करण्यात आले होते.

अभिनेता ते मंत्री…

उदयनिधी स्टॅलिन यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९७७ रोजी झाला. त्‍यांचे शालेय शिक्षण डॉन बॉस्को स्कूलमध्‍ये झाले. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लोयोला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि येथून बी.एस्सी.चे शिक्षण घेतले. तामिळ अभिनेता म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली. उदयनिधी हे तामिळ चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 2012 मधील 'पगली' या पदार्पणाच्या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर (दक्षिण) मिळाले आहे. घराण्याचा एवढा मोठा राजकीय वारसा पाहून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. उदयनिधीचा विवाह किरुथिगाशी यांच्याशी झाला आहे. किरुथिगा उदयनिधी या इनबॉक्स 1305 नावाच्या मासिकाचे संपादक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. उदयनिधी आणि किरुथिगा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. चित्रपटांमध्ये सक्रिय असण्यासोबतच उदयनिधी यांना खेळांचीही आवड आहे. त्यांची तामिळनाडूतील आक्रमक नेत्यांमध्ये त्यांची गणना होते आणि त्यांना एमके स्टॅलिनचे उत्तराधिकारी देखील मानले जाते.

Udhayanidhi Stalin : चार वर्षांपूर्वी राजकारण प्रवेश

उदयनिधी स्टॅलिन यांची राजकीय कारकीर्द फार वर्षांची नाही आहे. त्यांना राजकारणात येऊन ४ वर्षे झाली आहेत. याआधी त्यांनी साऊथ सिनेमात अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केले आहे. 'ओरू काल ओरू कन्नडी' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ४५ वर्षीय उदयनिधी अनेकदा जीन्स आणि शर्टमध्ये दिसतात.

2021 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले

उदयनिधी यांचा राजकीय प्रवास २०१९ मध्ये सुरू झाला. डीएमकेने त्यांना पक्षाच्या युवा शाखेचे सचिव बनवले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी द्रमुकचा जोरदार प्रचार केला. उदयनिधी यांनी 2021 मध्ये पहिल्यांदा चेपॉक-तिरुवल्लिकनी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच आमदार होऊन विधानसभेत पोहोचले.

अटकही करण्यात आली होती

उदयनिधी हे कोरोनाच्या काळात जनसंपर्क मोहीम राबवत होते, त्या दरम्यान त्यांना नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. मात्र अटकेनंतर काही तासांनी उदयनिधी यांची सुटका करण्यात आली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news