पुढारी ऑनलाइन डेस्क : Kalaram Mandir : संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांवर इस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून टीका केली. त्यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर प्रतिक्रिया देत सनातनी मनुवाद्यांवर कठोर टीकास्त्र सोडले आहे. आमदार आव्हाड यांनी ट्वीट करून सनातन्यांना लक्ष्य केले आहे. सोबत त्यांनी संयोगिताराजे छत्रपती यांची पोस्ट जोडली आहे. तसेच त्यांनी छत्रपती घराण्याला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही का ? सनातनींच्या धर्मात बहुजनांना जागा नाही का ? याचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. वाचा सविस्तर बातमी आणि काय आहे नेमके प्रकरण
रामनवमीच्या दिवशी संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात भेट दिली. येथे त्यांनी पूजा केली. मात्र, पूजा करताना तेथील महंतांनी पुराणोक्त पद्धतीने मंत्र म्हटले. याला संयोगिताराजे यांनी ठाम विरोध करत वेदोक्त मंत्रांनी पूजा करण्यास सांगितले. मात्र, त्याला तेथील पूजाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतींनी संयोगिताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही, असे म्हणत मज्जाव केला. त्यामुळे त्यांच्या या मनोवृत्तीवर संयोगिताराजे यांनी टीका केली. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तेथील महंतांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला.
संयोगिताराजे छत्रपती यांची ही इन्स्टापोस्ट व्हायरल झाली. यावर मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देऊन सनातनी मनुवाद्यांवर सडेतोड टीका केली. त्यांनी काळाराम मंदिराच्या महंतांच्या या कृतीला 'सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा', असे संबोधले. यावेळी त्यांनी हे फक्त संयोगिताराजें सोबतच घडले असे नाही तर छत्रपती शिवराय ते छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वांसोबत हे घडले आहे. या सनातनी मनुवाद्यांनी शिवाजी महाराज ते शाहू महाराजपर्यंत सर्वांना अशीच वागणूक यापूर्वी दिली आहे. शाहू महाराजांना तर या मनुवाद्यांनी शूद्र म्हणाले होते. ते आजही छत्रपतींना शूद्र समजतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की बरे झाले हे छत्रपीतंच्या वारसांसोबत घडले, मी जे सांगत होतो हाच तो सनातनी धर्म आजही वर्णव्यवस्था आहे हे ते दाखवून देतात. छत्रपतींच्या वारसांना जर ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचे काय ? असा प्रश्न करत त्यांनी बहुजनांना आवाहन केले की, आतातरी डोळे उघडा, हाच तो सनातन धर्म जो तुम्हाला शूद्रच मानतो.
"ह्याच काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी मंदीर प्रवेशा साठी आंदोलन केले होते. काही #सनातनी आजही आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते असे सनातनी धर्म परिषदेत फुशारक्या मरतात #सनातन_धर्म," असे आणखी एक ट्वीट आव्हाडांनी यामध्ये जोडले.
"काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा
छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही
छत्रपतीं शिवरयान बरोबर सनातनी मनुवादी असेच वागलेछत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली
शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी
आजही छत्रपतींना शुद्र समजतात.बर झाले हे छत्रपतींच्या वारसं बरोबर झाले
जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतातअजुन कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींन च्या वारसांना ही वागणूक मिळते तर बिकीच्यांच काय
बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो"