

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि प्रमोटर उदय कोटक यांनी बँकेच्या सीईओ आणि मॅनेंजिंग डायरेक्टर पदावरून निवृत्ती घेतली आहे. येथून पुढे ते बँकेत गुंतवणुकदार आणि नॉन एक्जिकिटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत असतील.
कोटक यांनी ३८ वर्षांपूर्वी कोटक महिंद्रा समूहाची स्थापना केली. त्यांनी एक्सवर त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली. कोटक महिंद्रा बँक ही आज भारतातील अग्रगण्य बँक आहे, या बँकेत जवळपास १ लाख कर्मचारी आहेत. या बँकेने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना भरघोस असा परतावा मिळवून दिला आहे.
कोटक यांनी एक्सवर अतिशय भावनिक अशी पोस्ट लिहिली आहे. वित्तक्षेत्रातील गोल्डमन सॅश आणि जे. पी. मोर्गन सारखी संस्था भारतात स्थापन करायची, या स्वप्नातून उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेची स्थापना केली होती. "३८ वर्षांपूर्वी मुंबईतील फोर्ट येथून एका फ्लॅटमध्ये आम्ही ही सुरुवात केली, त्या वेळी आमच्याकडे फक्त ३ कर्मचारी होते. हा प्रवास आणि हे स्वप्नातील क्षण आणि क्षण मी जगलो आहे," असे ते म्हणाले.
कोटक यांनी इन्व्हेस्टमेंट बँकिंग, स्टॉक ब्रोकिंग, विमा, म्युचअल फंड अशा विविध क्षेत्रांत बँकेचा विस्तार केला.
कोटक यांच्या निवृत्तीनंतर बँकेच सहकार्यकारी व्यवस्थापक दीपक गुप्ता यांच्याकडे कार्यभार देण्यात आलेला आहे. ३१ डिसेंबर २०२३पर्यंत दीपक गुप्ता यांच्याकडे हा कार्यभार असेल. गुप्ता गेली तीन दशके बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.
हेही वाचा