पुढारी ऑनलाइन डेस्क : Singapore President Election : सिंगापूरमध्ये एक दशकाहून अधिक काळानंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. यामध्ये आपल्या अन्य दोन चिनी वंशाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे टाकत भारतीय वंशाचे थर्मन शनमुगरत्नम यांनी ७० टक्क्यांहून अधिक मते मिळवत निवडणुकीत बाजी मारली. त्यांना ७०.४ टक्के मते मिळाली, अशी माहिती अमर उजाला ने दिली आहे.
सिंगापूरच्या निवडणूक विभागाने याबाबत माहिती दिली. सिंगापूरमध्ये तब्बल एक दशकानंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. नवव्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली, असे सांगण्यात येत आहे.
वर्तमान राष्ट्रपती हलीमा याकूब यांचा ६ वर्षांचा कार्यकाळ १३ सप्टेंबरला समाप्त होणार आहे. त्या देशाच्या आठव्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. २०१७ च्या राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुका या आरक्षित होत्या. त्यामुळे फक्त मलय समुदायाच्या सदस्यांनाच निवडणूक लढण्याची अनुमती होती. तेव्हा हलीमा यांना राष्ट्रपती पदासाठी नामांकित करण्यात आले होते. त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार नव्हता. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली होती.
सिंगापूरमध्ये 2011 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती पदासाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्यामुळे मतदान केंद्रांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून येत होता. वर्तमान राष्ट्रपती हलीमा आणि पंतप्रधान ली सीन लूंग हे देखील सकाळी-सकाळी मतदान केंद्रावर उपस्थित झाले होते.
या तिरंगी लढतीत थर्मन यांना एनजी कोक सोंग आणि टैन किन लियान यांनी कडवी झुंज दिली. कोक सोंग हे सरकार इन्वेस्टमेंट कॉर्प (जीआईसी) चे माजी मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. तर टैन किन लियान हे सिंगापूरच्या स्वामित्व असलेल्या संघ-आधारित विमा समूहाचे एनटीयूसी इनकमचे माजी प्रमुख आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार चिनी वंशाचे होते. दोघांनाही मागे टाकत भारतीय वंशाचे थर्मन शनमुगरत्नम यांनी निवडणूक जिंकली.
थर्मन शनमुगरत्नम हे एक अर्थशास्त्री आहेत. त्यांनी 2001 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सिंगापूरच्या सत्ताधारी पीपुल्स एक्शन पार्टी (पीपीपी) सोबत त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सार्वजनिक क्षेत्र आणि मंत्री पदावर कार्य केले आहे. थर्मन यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना महामारी काळातील आपले कार्य आणि मानव विकास सहित विभिन्न क्षेत्रात असलेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय अनुभवांचा हवाला देत राष्ट्रपती पदासाठी आपल्या योग्यतेचे समर्थन केले. तसेच त्यांच्याकडे अंदाजे दोन ट्रिलियन सिंगापूर डॉलरपेक्षा अधिक सरकार आणि सिटी स्टेटच्या विदेशी मुद्रा भंडारचा देखील अनुभव आहे.
सिंगापूरमध्ये यापूर्वी देखील दोन वेळा भारतीय वंशाचे राष्ट्रपती राहिले आहेत. सेलप्पन रामनाथन आणि देवन नायर या भारतीय वंशाच्या नेत्यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती पद भूषवले आहेत. देवन नायर यांचे पूर्ण नाव चेंगारा वीटिल देवन नायर असे आहे. देवन नायर देशाचे तिसरे राष्ट्रपती होते. ते मूळचे केरळचे होते. सेलप्पन रामनाथन यांना एसआर नाथन यांच्या नावाने देखील ओळखले जाते. ते मूळचे तामिळीयन सिविल सेवक होते. त्यांनी 2009 मध्ये बेंजामिन शियर्स यांना हरवून ते राष्ट्रपती बनले होते. तसेच ते सिंगापूरचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिले आहेत.
हे ही वाचा :