भारतीय वंशाची व्यक्ती बनणार सिंगापूरची राष्ट्राध्यक्ष? | पुढारी

भारतीय वंशाची व्यक्ती बनणार सिंगापूरची राष्ट्राध्यक्ष?

सिंगापूर : जगभरात अनेक देशांच्या उच्च पदांवर भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. आता सिंगापूरमधील भारतीय वंशाचे ज्येष्ठ मंत्री थरमन षण्मुगरत्नम तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी सर्व अधिकृत आणि राजकीय पदांचा राजीनामा दिला आहे. संसदीय कामकाजाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी षण्मुगरत्नम यांचा सत्कार केला आणि दोन दशकांहून अधिक काळ सार्वजनिक सेवेतील त्यांच्या योगदानाची स्तुती केली.

66 वर्षांचे थरमन षण्मुगरत्नम हे सिंगापूर सरकारमध्ये सामाजिक धोरणांचे समन्वयक मंत्री होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचा राजीनामा देणार आहेत. मंत्री म्हणून गुरुवारी त्यांनी संसदेतील शेवटची बैठक घेतली. सभागृह नेत्या इंद्राणी राजा म्हणाल्या, ‘आम्हाला या सभागृहात एस. एम. थरमन यांची आठवण येईल. त्यांची उपस्थिती प्रभावी तर होतीच; पण त्यांची भाषणेही अभ्यासपूर्ण होती. एस.एम. यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते गुंतागुंतीची आर्थिक तत्त्वे अगदी सोप्या पद्धतीने मांडायचे. त्याची बुद्धिमत्ता आणि वक्तृत्वाची आम्हाला आठवण येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एक मित्र आणि सहकारी खासदार म्हणून आम्हाला त्यांची उणीव भासेल.’

Back to top button